(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जलतरणपटू कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून 15 लाखांचे पारितोषिक | मराठी १ नंबर बातम्या
" />

जलतरणपटू कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून 15 लाखांचे पारितोषिक

नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2017 या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून 15 लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली आहे.

दिव्यांग जलतरणपटूंचा सहभाग असलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये कांचनमाला भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू होती. या स्पर्धेमध्ये एस-11 या श्रेणीत 200 मीटर वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली. तिच्या सत्काराप्रसंगी 15 लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.

ऑलिम्पिक, राष्ट्रकूल व आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारे खेळाडू तसेच त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याची योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेतील तरतुदींनुसार
पॅराऑलिम्पिक तसेच पॅरा एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे 30 लाख रुपये व 3 लाख रुपये इतके रोख बक्षीस देण्याची तरतूद आहे. मात्र, वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा
योजनेमध्ये समावेश नव्हता. तथापि, कांचनमालाचे कौतुकास्पद यश लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून या योजनेतून रोख पारितोषिक देऊन गौरव करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुसार याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यास मुख्यमंत्र्यांनी आज मंजुरी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget