विधानसभा : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्ते दुरुस्तीबाबत मंत्रालयात वॉर रुम

नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो कोकणवासीय जातात. त्यांना सुविधा मिळण्यासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची सचिव स्तरावर पाहणी करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीबाबत त्यांनी आराखडा दिला असून त्यासाठी मंत्रालय स्तरावर वॉर रुम स्थापन करण्यात येत आहे. त्याठिकाणी दुरुस्तीबाबत दररोज आढावा घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली.

सदस्य राजेश क्षीरसागर यांनी सांगली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न विचारला होता, यावेळी झालेल्या चर्चेत पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील प्रश्नांबाबत पाटील म्हणाले, येथील सात कामांपैकी दोन कामाच्या निविदा अंदाजपत्रिकेतील किंमतीपेक्षा कमी दराच्या असून पाच कामाच्या निविदा जवळजवळ अंदाजपत्रिकेतील दराच्या आहेत. अंदाजपत्रिकेतील किंमतीपेक्षा कमी दराच्याबाबत 10 टक्क्यापेक्षा खाली दर आल्यास तेवढी अनामत रक्कम घेतली जाते. तसेच शासन संबंधितांकडून पाच वर्ष देखभाल दुरुस्तीची हमीही घेते. तथापि तेथील कामांच्याबाबत पुन्हा चलन तपासणी करुन चौकशी केली जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अमल महाडीक, निलेश राणे यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget