(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा : अहमदनगर हत्याकांड प्रकरणी वकील उज्वल निकम यांची नेमणूक - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानसभा : अहमदनगर हत्याकांड प्रकरणी वकील उज्वल निकम यांची नेमणूक - मुख्यमंत्री

नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : अहमदनगर शहरातील केडगावमध्ये निवडणुकीवरुन राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या हत्याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी सुरु असून या प्रकरणासाठी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील निवडणूकीवरुन झालेल्या वादाच्या कारणावरुन आरोपींनी दोन व्यक्तींची हत्याप्रकरणाची लक्षवेधी सूचना सुनिल प्रभू यांनी उपस्थित केली होती त्याला उत्त्र देताना फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या हत्या प्रकरणात दोषारोप पत्र्‍ दाखल करण्यात आले असून तपास सुरु असल्याने अतिरिक्त दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच सर्व संशयीतांची कॉल रेकॉर्ड्स मागण्यात आले असून ते पुन्हा तपासण्यात येणार आहेत. तसेच या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव निकम यांनी मान्य केला असून प्रशासकीय बाबी पुर्ण केल्या जात आहेत. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे अशांवर कडक कारवाई करण्यात येईल.

कांदिवलीतील सचिन सावंत यांच्या हत्येप्रकरणी फडणवीस पुढे म्हणाले, या प्रकरणात पुराव्याच्या आधारे दोषारोप दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषणमार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून संशयितांचाही तपास केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच दोषींवर मोक्का लागत असल्यास तोही लावला जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी सदस्य मंगेश कुडाळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget