(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा : अंधेरीतील गोखले पादचारी पूल कोसळल्याप्रकरणाची रेल्वेप्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरु - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानसभा : अंधेरीतील गोखले पादचारी पूल कोसळल्याप्रकरणाची रेल्वेप्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरु - मुख्यमंत्री

नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : अंधेरीतील पुर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी पूल कोसळल्याप्रकरणाची रेल्वेप्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य योगेश सागर यांनी अंधेरीतील गोखले पादचारी उड्डाणपूल कोसळल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

मुंबईतील रेल्वे रुळावरील पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे रेल्वे प्रशासनाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे विभागाला पुलांच्या मेंटनन्ससाठी 2017-18 मध्ये मध्य रेल्वेला 11 कोटी आणि वेस्ट्रर्न रेल्वेला चार कोटी, 2018-19 मध्ये मध्य रेल्वेला साडेतीन कोटी आणि वेस्ट्रर्न रेल्वेला 24 लाख रुपये देण्यात आले आहेत.

हा पादचारी पूल महानगरपालिकेचा होता मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची होती. या पुलाचा मेंटनन्स करण्यात आला होता. परंतु ज्या प्रकारे या पुलाचा ऑडिट व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे झाले नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेसंदर्भात रेल्वे विभागाने उच्चस्तरीय चौकशी सुरु केलेली आहे. आणि त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच पुलांचे ऑडिट आणि उपाययोजना करण्यासाटी आयआयटीच्या सहाय्याने पथके निर्माण करण्यात आले असून पुढच्या पावसाळ्यात या पथकाचे अहवाल येईल त्यानुसार सुधारणा केल्या जातील व त्यासाठी कालमर्यादा ठरविली जाईल. नवीन कामांमध्ये युटिलिटी कॉरिडॉर तयार करण्याच्या महानगरपालिकेला सूचना देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. हॅकाँक पूलबाबत बोलताना या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच काम सुरु करण्यात येईल. यावेळी सदस्य सर्वश्री अमित साटम, वारीस पठाण, मनीषा चौधरी, भारती लव्हेकर यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget