नागपूर, दि. 18 : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीसाठी आजपासूनच उत्पन्न मर्यादा 6 लाखावरुन 8 लाख रुपयांपर्यंत करण्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत केली. सदस्य ख्वाजा बेग यांनी विधानपरिषदेत नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा
उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना कांबळे म्हणाले, मुस्लिम समाजाच्या विविध योजनांसाठी लवकरच संचालनालय स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अल्पसंख्याक महिलांसाठी महामंडळांच्या मार्फत मदत केली जाईल. शासन अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिल. या चर्चेत सदस्य सर्वश्री जोगेंद्र कवाडे, हरिभाऊ राठोड, गिरीश व्यास, हुस्नबानू खलिफे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा