मुंबई ( १४ ऑगस्ट २०१८ ) : ज्येष्ठ नटवर्य जयवंत नाडकर्णी यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू कलाकार, दिग्दर्शक गमावला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात तावडे म्हणतात, नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांच्याकडून जयवंत नाडकर्णी यांनी रंगमंचाचा गणेशा गिरवला. त्यांनी नानासाहेबांसोबत हॅम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत महत्वाच्या भूमिका केल्या. 'रंगायन' या नाट्यसंस्थेच्या प्रत्येक नाट्य कलाकृतीत नाडकर्णी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौंतेय, एकशून्य सारख्या नाटकांमधून कमलाकर नाडकर्णी, लालन सारंग, सुलभा देशपांडे आदी ज्येष्ठ कलाकारांसमवेत प्रायोगिक, व्यावसायिक नाट्यकृती करणाऱ्या जयंत नाडकर्णी यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची मोठी हानी झाल्याचेही शेवटी तावडे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा