(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); माल वाहतूक व्यवसायातील विविध घटकांना नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या
" />

माल वाहतूक व्यवसायातील विविध घटकांना नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

मुंबई ( १७ जुलै २०१८ ) : माल वाहतूक व्यवसायातील विविध घटकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधितांनी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन मुंबई-मध्य विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी केले.

कॅरेज बाय रोड अधिनियम 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व मंत्रालय, नवी दिल्ली यांचे नुसार कॅरेज बाय रोड नियम 2011 पासून प्रसिद्ध करण्यात आला होता. या नियमानुसार माल वाहतूक व्यवसायातील वाहतुकदार, ठेकेदार, बुकिंग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/पाकिटे/मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणुक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना ‘कॉमन कॅरिअर’ म्हणुन क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.

संबंधीतांनी मध्य मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे मध्य मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आवाहन केले आहे. नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसल्यास मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही नमुद करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget