मुंबई ( १७ जुलै २०१८ ) : ज्येष्ठ अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरील 'आई' म्हणून प्रसिध्द असणाऱ्या रिटा भादुरी यांच्या निधनाने छोट्या पडद्यावरील आई कायमची हरपल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शेाकसंदेशात व्यक्त केली आहे.
तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, रिटा भादुरी यांनी निमकी मुखिया या मालिकेत साकारलेल्या इमरती देवी भूमिका विशेष गाजली. प्रकृती ठीक नसतानाही रिटाजी शेवटपर्यंत रंगभूमीची सेवा करीत राहिल्या यावरुनच त्यांची कामावर असलेली कटिबध्दता दिसून येते. सिनेमा, मालिकांमध्ये वेगवेगळया भूमिका करुन त्यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिकांच्य्या मनावर कोरली आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा