(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारणार दक्षिण आशियातील सर्वात मोठे डाटा सेंटर - राज्यमंत्री दीपक केसरकर | मराठी १ नंबर बातम्या
" />

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारणार दक्षिण आशियातील सर्वात मोठे डाटा सेंटर - राज्यमंत्री दीपक केसरकर

मुंबई ( ८ ऑगस्ट २०१८ ) : भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पाऊल टाकले असून माल्टा देशाच्या सहकार्याने डिसेंबरमध्ये माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठे डाटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. माल्टा देशाचे पर्यटन मंत्री कोनरॅड मिझ्झी आणि पंतप्रधान कार्यालयातील सचिव तानिया ब्राऊन आदी यावेळी उपस्थित होते.

माल्टा देशाचे पर्यटन मंत्री मिझ्झी आणि माल्टाच्या पंतप्रधान कार्यालयातील सचिव तनिया ब्राऊन यांचे शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे पालक मंत्री केसरकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत
सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली. केसरकर म्हणाले, माल्टा देशाबरोबर महाराष्ट्राचे संबंध वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातून शैक्षणिक, पर्यटन व तंत्रज्ञान क्षेत्रात माल्टा देश सहकार्य करणार आहे. त्यानुसार सिंधुदुर्गमधील पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग येथे दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठे डाटा सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माल्टा व तेथील स्ट्रिम कास्ट ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी मदत करणार आहे. सिंधुदुर्गमधील स्थानिकांना माहिती तंत्रज्ञान, पर्यटन क्षेत्राविषयीचे शिक्षणही देण्यात येणार आहे. माल्टाचे पर्यटन मंत्री मिझ्झी यांनी सांगितले, भारतात पर्यटन, बॉलीवूड, आरोग्य पर्यटन, आदरातिथ्य, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्यास माल्टा देशाचे पंतप्रधान इच्छुक आहेत. याचाच भाग म्हणून येत्या डिसेंबरमध्ये माल्टामध्ये भारतीय चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्याबरोबर मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, स्ट्रिमकास्ट कंपनीचे अध्यक्ष निमेशभाई, मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन साळवे आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget