(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); करूणानिधी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी- मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या
" />

करूणानिधी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी- मुख्यमंत्री

मुंबई ( ७ ऑगस्ट २०१८ ) : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रवीड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम करूणानिधी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देशाच्या राजकारणात एक वरिष्ठ नेते असलेल्या करुणानिधी यांनी तामिळनाडूच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. अतिशय लोकप्रिय नेते असलेल्या करूणानिधी यांचे तामिळनाडूच्या विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान राहिले आहे. सिद्धहस्त लेखक आणि प्रभावी वक्ते असलेल्या करूणानिधींचा सामाजिक सुधारणा हा विशेष आस्थेचा विषय होता. पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या करूणानिधींची तामिळनाडूसोबतच देशाच्या राजकारणातही नेहमीच महत्त्वाची भूमिका होती. तामिळनाडूचा राजकीय इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget