(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); केरळला आर्थिक मदत करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या
" />

केरळला आर्थिक मदत करण्याचे आवाहन

मुंबई ( २३ ऑगस्ट २०१८ ) : केरळ राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या आपद्‌ग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक व संस्था मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. मदत करण्यास इच्छूक असणाऱ्यांनी आपले आर्थिक सहाय्य Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डिमान्ड ड्राफ्टच्या (डीडी) स्वरुपात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

भीषण महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक सहाय्यासह विविध स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे. केरळमधील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपली आर्थिक मदत बँक ऑफ महाराष्ट्रमधील राज्य शासनाच्या 60312978149 या खाते क्रमांकावर Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डीडी स्वरुपात पाठवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget