मुंबई ( ५ ऑगस्ट २०१८ ) : घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक 133 येथे कामराज नगर मधील माता रमाबाई आंबेडकर नगर, नालंदा नगर ,कामराज नगर, आर.टी.ओ. इत्यादी परिसरातील 10 वी 12 वी पास झालेल्या सर्व मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा गुणगौरव सोहळा स्थानिक शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी रविवारी आयोजित केला होता. विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते पार पडला. शिवसेना पक्षाचे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, महिला विभाग संघटीका भारतीताई बावधाने, उप विभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, उप विभाग प्रमुख संजय (बाबु) दरेकर, विभाग संघटक ज्ञानदेव वायाळ, महिला उप विभाग संघटीका प्रीतीताई जाधव, उप विभाग संघटीका सुरेखा घुगे, शाखाप्रमुख प्रमुख शरद कोथेरे, शाखाप्रमुख गजानन परब, शाखाप्रमुख जितेंद्र परब, शाखाप्रमुख अजित गुजर, शाखाप्रमुख नाना ताठेले, महिला शाखा संघटीका शकुंतलाताई शिंदे व सर्व आजी माजी पदाधिकारी यां सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ही सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा