(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 18 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालतचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या
" />

अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 18 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालतचे आयोजन

मुंबई ( २३ ऑगस्ट २०१८ ) : सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन सुधारणेबाबत अखिल भारतीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी दिनांक 18 सप्टेंबर रोजी मंत्रालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या विभागास 31 ऑगस्टपर्यंत म्हणणे लेखी स्वरुपात इमेल, फॅक्स किंवा पोस्टाने सादर करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाने सूचित केल्यानुसार दि. 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय (विस्तार इमारत), मुंबई येथे या पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवा निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास भारतीय प्रशासन सेवेतून निवृत्त अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभाग, भारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी गृह विभागाकडे तर भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाकडे दि. 31 ऑगस्ट,2018 पूर्वी सादर करावे. तसेच दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत पेंशन अदालत मध्ये स्वत: किंवा प्रतिनिधीने तक्रारीसह उपस्थित रहावे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget