(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालयात हलला‘पेंग्विन‘चा पाळणा | मराठी १ नंबर बातम्या
" />

भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालयात हलला‘पेंग्विन‘चा पाळणा

पिलाला पाहण्यासाठी मुंबईकरांना थांबावे लागणार २-३ महिने

( भारतात पहिल्यांदाच पेंग्विन जन्मला -

marathi1numberbatmya news website या आमच्या youtube चॅनेल वर आपण पेंग्विन चा व्हिडियो पाहू शकता. )

मुंबई ( १६ ऑगस्ट २०१८ ) : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथिल निसर्ग शिक्षण केन्‍द्रामधील हम्‍बोल्‍ट पेंग्विन कक्षामध्‍ये एकूण सात हम्‍बोल्‍ट पेंग्विन पक्षी प्रदर्शित करण्‍यात आले आहेत.

या पेंग्विन पैकी मोल्‍ट व फ्ल‍िपर या पेंग्विन जोडीपैकी फ्ल‍िपर या मादी पेंग्विन पक्ष्‍याने दिनांक ५ जूलै २०१८ रोजी सदर पेंग्विन कक्षामधील त्‍यांनी निवडलेल्‍या जागी तयार केलेल्‍या घरटयामध्‍ये एक अंडे घातले होते. अंडे उबविण्‍याचा कालावधी सुमारे ४० दिवसांचा असतो. दोन्‍ही पालकपक्षी आळीपाळीने सदर अंडे उबवित होते.

दि. १५ ऑगस्‍ट २०१८ रोजी संध्‍याकाळी ८ वाजून २ मिनिटांनी अंडयातून पेंग्विन पिल्‍लाचा जन्‍म झाला. दोंन्‍ही पालकपक्षी नवजात पिल्‍लाची उत्‍तमप्रकारे काळजी घेत आहेत. पिल्‍लाचे लिंग अद्यापी समजले नसून नजिकच्‍या कालावधीमध्‍ये डी.एन.ए. परीक्षणाद्वारे ते निशि्चत करण्‍यात येईल.

सदर पिल्‍लू हे सुरुवातीचे दोन ते तीन महीने घरटयाच्‍या आतमध्‍ये राहणार असल्‍यामुळे त्‍यानंतर त्‍याचे दर्शन नागरिकांना होऊ शकेल, याची सर्वांनी कृपया नोंद घ्‍यावी असे पालिकेने कळविले आहे. या पेंग्विन्‍ससाठी नियुक्‍त करण्‍यात आलेल्या डॉ. मधुमिता काळे व त्‍यांचे सहकारी पशुवैद्य व प्राणिपाल यांचे पथक दोन्‍ही पालकपक्षी व नवजात पिल्‍लाच्‍या प्रकृती व देखभाल संबंधाने सातत्‍याने काळजी घेत आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, हे हम्‍बोल्‍ट पेंग्विन पक्षी प्रदर्शित करणारे संपूर्ण देशामधील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे.सदर हम्‍बोल्‍ट पेंग्विन पक्षी या ठिकाणी आणण्‍यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नागपूर व केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्‍ली यांचे विशेषतः डॉ. डी.एन.सिंग, सदस्‍य सचिव,केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्‍ली यांचे मोलाचे सहकार्य प्राप्‍त झाले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget