(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नागरी सेवा परीक्षा : मुंबई केंद्राची प्रवेश परीक्षा 4 नोव्हेंबर रोजी | मराठी १ नंबर बातम्या
" />

नागरी सेवा परीक्षा : मुंबई केंद्राची प्रवेश परीक्षा 4 नोव्हेंबर रोजी

मुंबई ( ६ ऑगस्ट २०१८ ) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा देणाऱ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामार्फत 11 महिने पूर्णवेळ विनामूल्य परिक्षा पुर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरिता मुंबई केंद्रामार्फत 4 नोव्हेंबर 2018 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्थेने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार असून संस्थेमार्फत www.siac.org.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 13 ऑगस्ट 2018 ते 14 सप्टेंबर 2018 असा आहे. प्रवेश परीक्षा पत्र 23 ऑक्टोबर 2018 ते 4 नोव्हेंबर 2018 या कालावधीत उपलब्ध होणार असून 4 नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा असेल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget