बालविठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने सायनमधल्या ‘माऊली’ तृप्त!
मुंबई (२३ जुलै २०१८) : सायनमध्ये आज जणू पंढरपूरची वारीच अवतरली होती. इयत्ता तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी धोतर-सदरा-टोपी घालून, तर हातात टाळ घेऊन आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी नेसून व डोक्यावर तुळस घेऊन वारकर-यांच्या पारंपरिक वेषभूषेत सायनच्या सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिराचा परिसर विठुरायाच्या गजराने दणाणून सोडला. टाळ-मृदंगांच्या संगीताच्या तालावर या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग गायले आणि उपस्थितांना ‘वृक्षवल्लीं’चे महत्व पटवून दिले. सायनच्या डी. एस. हायस्कूलमध्ये गेल्या ५० वर्षांपासून आषाढी एकादशीला बालदिंडी काढण्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीहीहरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठलाचा जयघोष करत पायी निघालेले वारकरी, विठ्ठल-रखुमाईच्या साजिऱ्या वेषातील बाळगोपाळ आणि विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेले नागरिक हे दृश्य सोमवारी सायनमध्ये दिसले. “शालेय विद्यार्थ्यांना तसंच नागरिकांनाही पर्यावरणाच्या संदर्भात वृक्षारोपणाचे महत्व कळावे, यासाठी वृक्षदिंडी काढत वृक्षरोपणाचा संदेश देण्यात आला”, असे डी. एस. हायस्कूलच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यपिका शीला देशपांडे यांनी सांगतले.

टिप्पणी पोस्ट करा