(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर | मराठी १ नंबर बातम्या
" />

राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई ( २६ ऑगस्ट २०१८ ) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येईल.

मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे – प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध - शनिवार, दि. 1 सप्टेंबर 2018; दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी - शनिवार, दि. 1 सप्टेंबर ते बुधवार, दि. 31 ऑक्टोबर 2018; दावे व हरकती निकालात काढणे : शुक्रवार, दि. 30 नाव्हेंबर 2018 पूर्वी; डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई - गुरुवार, दि. 3 जानेवारी 2019 पूर्वी; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - शुक्रवार, दि. 4 जानेवारी 2019.

दि. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरीकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2001 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवाशी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.

दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) (ERO)यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget