अन्न व औषध प्रशासनाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी औषध पुरवठा

मुंबई ( २५ ऑगस्ट २०१८ ) : केरळ राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने विस्कळीत झालेले जनजीवन व उद्भवलेल्या आरोग्य विषयक परिस्थितीशी सामना करण्यासाठी देशभरातून विविध प्रकारे मदतीचा ओघ केरळकडे अव्याहत सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मदत कार्यात सर्वतोपरी सहभाग घेण्याचे आवाहन सर्व स्तरांवर केलेले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास अनुसरुन गिरीष बापट, मंत्री, अन्न व औषध प्रशासन व डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व औषध उत्पादक व वितरक यांना केरळ पूरग्रस्तांसाठीच्या मदत कार्यात आरोग्य विभाग,केरळ यांचे आवश्यकतेनुसार औषधे देण्याबाबत आवाहन करण्यात आले. या आवाहनास राज्यातील बहुतेक औषध उत्पादक,विक्रेते व पुणे येथील औषध विक्रेते संघटना यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व औषधसाठा मोफत उपलब्ध करुन दिला. या औषधांमध्ये प्रामुख्याने रक्तदाब, मधुमेह, ह्दय विकार इ. वरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा समावेश आहे. केरळ येथे रवाना करण्यासाठी सदर औषधसाठा समन्वय अधिकारी डॉ. तायडे,अधिष्ठाता, जे.जे. समूह रुग्णालय, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget