मुंबई (१ ऑगस्ट २०१८ ) : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. खासदार संजय धोत्रे हे अकोला मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम १९८३ मधील कलम १२(२) (ब) मधील तरतुदीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा