नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : मुंबईतील 'एल्फिन्स्टन रोड' रेल्वे स्थानकाचे नाव 'प्रभादेवी' रेल्वे स्थानक असे करण्याबाबत राज्य शासनाच्या परिवहन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मान्यता दिली होती. आज मध्यरात्रीपासून (18/19 जुलै) याची अंमलबजावणी होणार असून स्थानकावरील फलके, तिकीटावर 'प्रभादेवी' असे नाव झळकणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी आपण करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
केंद्र शासनाच्या गृहविभागाने राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता दिली होती. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे विभागाने आदेश जारी केला असून आज मध्यरात्रीपासून (18/19 जुलै) त्याची अंमलबजावणी होणार आहे. या नव्या निर्णयानुसार युटीएस प्रणालीमध्ये डिजीटल डिस्प्ले फलकावर प्रभादेवी स्थानकाचे नाव PBHD असे दर्शविण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा