मुंबई ( ५ ऑगस्ट २०१८ ) : घाटकोपर येथील कामराज नगर मधील माता रमाबाई आंबेडकर नगरात भारतीय भिक्खु संघाच्या अभ्यासिका आणि धम्म सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. प्रभाग क्रमांक १३३ चे शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नाने अभ्यासिका आणि धम्म सभागृहाचे निर्माण करण्यात आले असून भदन्त संघकिर्तीजी महाथेरो आणि भदन्त कश्यपजी महाथेरो भिक्खु विरत्न थेरो यांचे आशीर्वाद लाभले आहेत. लोकार्पण सोहळा शिवसेना नेते माजी मंत्री लिलाधर डाके, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, महिला विभाग संघटीका भारतीताई बावधाने, उप विभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, उप विभाग प्रमुख संजय (बाबु) दरेकर, विभाग संघटक ज्ञानदेव वायाळ, नरेश माटे, अजित भाईजे महिला उप विभाग संघटीका प्रीतीताई जाधव, उप विभाग संघटीका सुरेखा घुगे, शाखाप्रमुख प्रमुख शरद कोथेरे, शाखाप्रमुख गजानन परब, शाखाप्रमुख जितेंद्र परब, शाखाप्रमुख अजित गुजर, शाखाप्रमुख नाना ताठेले, महिला शाखा संघटीका शकुंतलाताई शिंदे व सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा