एक ट्रकभर कपडे केरळकडे रवाना ; लवकरच औषधसाठा, वैद्यकीय पथकासह महाजन केरळला जाणार
मुंबई ( १८ ऑगस्ट २०१८ ) : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तेथील पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० कोटीचे अर्थसहाय्य आणि अन्नपुरवठा करण्याची आज घोषणा केल्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही एक ट्रकभर कपडे केरळला रवाना केले आहेत. लवकरच पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांचे एक पथक पुरेशा औषधसाठ्यासह केरळला पाठविण्यात येणार असून स्वतः महाजन सुद्धा केरळ येथे भेट देणार आहेत.
स्वतः महाजन व रत्नदीप फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे एक ट्रकभर कपड़े पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार असून हा ट्रक आज केरळकड़े रवाना होत आहे. डॉक्टरांचे एक पथक पुरेशा औषधसाठ्यासह केरळला पाठविण्यात येणार आहे. या मदत कार्यात सहभागी होण्यासाठी स्वतः महाजन सुद्धा केरळ येथे लवकरच भेट देणार आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा