(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); क्रीडाविषयक उपक्रमांच्या आयोजनासाठी विविध योजनांची तरतूद | मराठी १ नंबर बातम्या
" />

क्रीडाविषयक उपक्रमांच्या आयोजनासाठी विविध योजनांची तरतूद

अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आवाहन

मुंबई ( १० ऑगस्ट २०१८ ) : क्रीडा विभागामार्फत क्रीडा व युवक सेवा अंतर्गत कार्य करणाऱ्या संस्थांना क्रीडा विषयक व युवक कल्याण विषयक उपक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्यावतीने जिल्हास्तरावर विविध योजनांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायाम शाळा विकास अनुदान योजना यामध्ये कार्य करणाऱ्या स्वयंसेवी युवक मंडळ संस्थांना आर्थिक सहाय्य अशा विविध योजनांचा समावेश आहे.

योजनांच्या अंमलबजावणीकरिता ज्या शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, शासकीय संस्था, स्वायत्त संस्था यांना अर्ज सादर करावयाचा असेल किंवा अनुदानासंबंधी अधिक माहिती घ्यावयाची असेल त्यांनी मुंबई उपनगर जिल्हयातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई 400101 या ठिकाणी अथवा 022-28871105 येथे संपर्क साधावा, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget