रत्नाकर मतकरी, माधव रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार

मुंबई ( २१ ऑगस्ट २०१८ ) : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०१७-१८ चा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार सुप्रसिध्द साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार माधव रामानुज यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायं ६ वाजता झवेरबेन पोपटलाल सभागृह ऑडिटोरीअम, घाटकोपर येथे आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणाऱ्या अन्य पुरस्कारांमध्ये जीवन गौरव साहित्य पुरस्कार भरत नायक-गीता नायक, जीवन गौरव कला पुरस्कार प्रवीण सोलंकी, जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार केतन मिस्त्री, जीवन गौरव संस्था पुरस्कार सोलापूर गुजराती मित्र मंडळ यांना घोषित करण्यात आला असून, शुक्रवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार किरीट सोमैय्या आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषा व साहित्याच्या ‍ विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. गुजराती साहित्य अकादमीतर्फे यावर्षी १४ पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये २ कवी नर्मद, ४ जीवनगौरव, ८ वाङ्मय पुरस्कार यांचा समावेश आहे. सर्व पुरस्कारार्थींना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच अन्य ८ वाड्:मय पुरस्कारांमध्ये चुनीलाल मडिया प्रथम पुरस्कार प्रेरणा के. लीमडी, चुनीलाल मडिया व्दितीय पुरस्कार मीनल दीक्षित, रामनारायण पाठक प्रथम पुरस्कार इला आरब मेहता, रामनारायण पाठक व्दितीय पुरस्कार प्रफुल शाह, हरिश्चंद्र भट्ट व्दितीय पुरस्कार सतीश व्यास, वाडीलाल डगली प्रथम पुरस्कार प्रो. हितेश पंडया, गोपाळराव वि´दवांस प्रथम पुरस्कार उर्वशी पंडया, गोपाळराव वि´दवांस व्दितीय पुरस्कार नीला रोठाड यांना देण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget