(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); देवनार पशुवधगृह बकरी ईदसाठी उपलब्ध विविध सेवा सुविधा | मराठी १ नंबर बातम्या
" />

देवनार पशुवधगृह बकरी ईदसाठी उपलब्ध विविध सेवा सुविधा

मुंबई ( १८ ऑगस्ट २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देवनार पशुवधगृह येथे बकरी ईद या सणाच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाने विविध स्वरुपाच्या नागरी सेवा-सुविधा सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याबाबत देवनार पशुवधगृहाच्या महाव्यवस्थापकांद्वारे कळविण्यात आलेली माहिती पुढील प्रमाणे :-

निवारा : शेळया मेंढयांच्या व म्हैस वर्गीय प्राण्यांच्या निवा-यासाठी ४०,००० चौ.मी. या नियमित वाडयांच्या व्यवस्थेव्यतिरिक्त ५०,००० चौ.मी. चे तात्पुरते वाडे उभारण्यात आले आहेत.

विद्युत व्यवस्था : वाडयांतील व रस्त्यांवरील नियमित विद्युत व्यवस्थेव्यतिरिक्त ४० वॅटच्या २४०० टयुबलाईट, ५०० वॅटचे ४९० हॅलोजन दिवे व १००० वॅटच्या ४७५ दिव्यांची तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ६३ के.व्ही.ए. क्षमतेची २२ विद्युतजनित्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत व १३ तात्पुरते विदयुत मीटर्स घेण्यात आली आहेत.

जलपुरवठा: नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, ५००० लिटर्स क्षमतेच्या ४ टाक्या व १०००० लिटर्स क्षमतेच्या २ टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांसाठी कायम पिण्याच्या टाक्यांसह एकूण ८० टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पाणी टाक्यांची क्षमता १ लाख लिटर्स आहे.

आरोग्यः नागरिक, अधिकारी / कर्मचारी, जनावरांचे व्यापारी यांच्यासाठी सकाळी ९ ते रात्रौ ११ या वेळांत मुख्य दवाखान्यात व बाजार विभागात एका अतिरिक्त प्रथमोचार केंद्रात मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेची २४ तास सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, दोन रुग्णवाहिका व दोन १०८ रुग्णवाहिका १५ दिवसांकरिता कायमस्वरुपी तयार ठेवण्यात आलेली आहे. जनावरांच्या उपचारासाठी मुंबई पशुवैदयकीय महाविदयालय, प्राणी प्रेमी, अशासकीय सस्थांचे पशुवैदयक, नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांच्या मार्फत प्रथमोपचार केंद्रे उघडण्यात आले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन : नियमित दोन पाळयांऐवजी कच-याच्या विल्हेवाटीसाठी तीन पाळयात घनकचरा उचलण्यात येणार आहे. बकरी ईदच्या कालावधीत निर्माण होणारा कचरा गोळा करण्याकरिता १४ कचरा डेपो निर्माण करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी नियमित ३० शौचालयांव्यतिरिक्त, ८ सुलभ शौचालय संकुल (११२ शौचालये), उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच स्त्रियांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मृत जनावरांकरीता वेगळया शेड बांधण्यात आल्या आहे. कचरा उचलण्यासाठी ३ घंटागाडयांची ३ पाळयांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.

धार्मिक वधाची व्यवस्था : धार्मिक वधासाठी ९,००० चौ.मी. जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. उपनगरे विभाग, केना शेड येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे पहाटे ५.०० ते सूर्यास्तापर्यंत पशुवैद्यकीय अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. बकरी ईद व पुढील २ दिवस बक-यांचा धार्मिक वध, बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत देवनार पशुवधगृहाबाहेर इच्छित स्थळी करण्याकरिता, दि. १०.०८.२०१८ ते २४.०८.२०१८या कालावधीत महानगरपालिका अधिनियम १८८८ कलम ४०३ (२) (e) अन्वये धार्मिक वधाकरिता परवानगी देण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे.

उपहारगृहे : व्यापारी व जनतेच्या सोयीसाठी ५ स्थायी उपहारगृहांव्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टीने १४ तात्पुरती उपहारगृहे फुड झोनच्या (Food Zone) स्वरुपात बसविण्यात आली आहेत.

जनसंपर्क व नियंत्रण कक्ष : परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तेथे तिन्ही पाळयात जबाबदार अधिकारी हे व्यापारी व जनतेच्या तक्रारी सोडविण्यास २४ तास उपलब्ध असतील. नागरिकांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याकरीता ४ हेल्पलाईन (भ्रमणध्वनी) मध्यवर्ती कक्षामधे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन कक्षाशी तात्काळ संपर्काकरिता Hot line व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर हेल्पलाईनचा नंबर १) ८६५७४१९८४६ २) ८६५७४१९८४७ ३) ८६५७४१९८४८ ४) ८६५७४१९८४९.

जनावरांची संख्या सर्वसामान्यांना अवगत होण्यासाठी डिजीटल इंडीकेटरची सुविधा पुरविण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात प्रवेशव्दारावर नकाशा व मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आली आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी स्थळदर्शक फलक लावण्यात आले आहेत. परिसरात सी.सी.टी.व्ही. व्दारे निरीक्षण ठेवण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget