(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); चंद्रपूरच्या 'मिशन शक्ती 'मध्ये आमिर खान सहभागी होणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार | मराठी १ नंबर बातम्या
" />

चंद्रपूरच्या 'मिशन शक्ती 'मध्ये आमिर खान सहभागी होणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई ( २२ ऑगस्ट २०१८ ) : चंद्रपूर जिल्हयातील युवक-युवतींना ऑलीम्पीकमध्ये सहभागी होता यावे यासाठी “मिशन शक्ती”अभियान राबविण्यात येणार आहे. त्याला अभिनेते आमीर खान यांचे पाठबळ मिळणार असून या मिशनमध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबईत खान यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही मान्यता दिल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, लवकरच ते यासाठी चंद्रपूर येथे येणार आहेत. ताडोबा अभयारण्य आणि खाणीचे त्यांना आकर्षण आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमधील आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात देशपातळीवर आपले नाव कोरले आहे. नुकत्याच झालेल्या मिशन शौर्य मध्ये याच जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्रम्हपूरीचे येरमे बंधू आंतरराष्ट्रीय कराटे चैंपियनशिप साठी अॅथेन्स येथे रवाना झाले आहेत. या जिल्ह्यातून सैन्यामध्ये, अर्धसैनिक दलात, पोलिसात काम करणारे अनेक युवक आहेत. या जिल्ह्यांचा देशसेवेसाठी काम केल्याचा आपला स्वतःचा असा इतिहास आहे. ही बाब लक्षात घेता मिशन शक्तीमधून जिल्ह्यातील युवक-युवती ऑल्म्पिकमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव नक्की वाढवतील असा विश्वास ही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बैठकीत मुनगंटीवार यांनी आमीर खान यांना राज्यातील वनसंपदा, वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली. मिशन शौर्यमधील आदिवासी विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी त्यांना सांगितली. सध्या आशियाई स्पर्धा जकार्तामध्ये सुरू आहे हा धागा पकडून त्यांनी आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे काही विशिष्ट क्रीडाप्रकारांमध्ये पदक वाढविण्याची क्षमता या भागातील विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे सांगितले.

चंद्रपूरमध्ये येत्या डिसेंबर पर्यंत सर्व तालुक्यातील क्रीडा संकुले तयार होत आहेत. बल्लारपूर येथे तयार होणाऱ्या विशेष क्रीडा संकुलामध्ये अशा प्रकारच्या क्रीडा प्रकाराला चालना देण्याची तयारी केली जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. आमीर खान यांना हा प्रयत्‍न भावला असून त्यांनी अशा पद्धतीने एखादया भागात लोकप्रतिनिधी विशेष प्रकल्पासाठी काम करीत असल्याचे ऐकून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीमध्ये सहा क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये वेटलिफीटींग, धर्नुविद्या, नेमबाजी, जलतरण, ॲथेलेटिक्स, व्हॉलीबाल वजिम्नॉस्टिक्स या खेळाचा सहभाग असेल. यासाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील गुणवान, काटक, चपळ व उच्च शारीरिक क्षमता असणाऱ्या मुलांची कडक चाचणीद्वारे निवड केली जाणार आहे .या सर्व मुलांना आवश्यक शैक्षणिक सुविधा देतांना संबंधित क्रीडाप्रकारातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील उद्योग-व्यापार जगतातील नामवंत व्यक्तींकडून सामाजिक दायित्व निधी अंतर्गत आर्थिक मदत घेतली जाईल असे ही ते म्हणाले. याचवर्षी या युवक-युवतींच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून यासाठी 2024 च्या ऑलंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे ही मुनगंटीवार यांनी सांगितले.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावे पाणीदार करण्यासाठी आमिर खान यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. पाणी समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा हा पुढाकार मैलाचा दगड ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget