मुंबई (२३ जुलै २०१८) : चीन आणि भारत या दोन देशांमध्ये राजकीय संबंध अधूनमधून तणावाचे होत असले तरी कैलास मानसरोवरच्या यात्रेसाठीच्या ‘पेजपुजे’साठी हे दोन्ही देश एकत्र आले आहेत. चीनच्या तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी दरवर्षी हजारो भारतीय नागरिक मोठ्या भक्तिभावाने जात असतात, पण तिथे त्यांची जेवणाची आबाळ होते. आता मात्र जम्मूतल्या मधुबन फूड्स या एकाच कंपनीला संपूर्ण कैलास यात्रेसाठी खाद्यपदार्थ पुरवण्याचं काम सोपवण्यात आल्यामुळे शिवभक्तांच्या तसंच पर्यटकांच्या सात्विक पेटपूजेचा प्रश्न मिटणार आहे. भारत, नेपाळ व चीन या तीन देशांदरम्यान झालेल्या महासहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.
मोलाची भूमिका बजावत आहेत. ते सांगतात की, “ भारतातील यात्रेकरूंना त्यांच्या खाण्याच्या सवयींना अनुसरून खाणे मिळणे खूप आवश्यक असते. यात्रेचा मार्ग अतिशय कठीण आहे, त्यावरून मार्गक्रमण करत असताना यात्रेकरूंना चांगले खाणे मिळाले तर ते ही यात्रा अतिशय समाधानाने पूर्ण करू शकतात. यामुळे भविष्यात जास्तीत जास्त यात्रेकरू कैलास मानसरोवरकडे वळतील.”
कैलास यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना ज्याप्रकारचे जेवणाची अपेक्षा असते तसे योग्य जेवण मिळावे यासाठी यावर्षी पहिल्यांदाच चीनने भारत व नेपाळसोबत हातमिळवणी केली आहे. भारत व चीन या दोन देशांदरम्यानच्या संबंधांच्या दृष्टीने ही खूप महत्वाची बाब आहे.
चायना-इंडिया पिलग्रिम्स सर्विस सेन्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान क्वान लिन यांनी सांगितले की, “चीनने या यात्रेसाठी अतिशय चांगले रस्ते, हॉटेल्स व इतर सुविधा पुरवल्या आहेत. भारत, चीन व नेपाळ दरम्यान झालेल्या या सहयोगामुळे आमच्या सेवांना नवी उंची मिळाली आहे, यात्रेकरूंच्या आरोग्याची आम्ही अधिक चांगली काळजी घेऊ शकू.” वान यांनी असेही सांगितले की, “याआधी ज्याठिकाणी यात्रेकरू थांबत त्याठिकाणी तात्पुरते स्वयंपाकघर पुरवले जाई. यात्रेकरू त्यांच्या थांब्यावर पोचले की, तात्पुरते स्वयंपाकघर बनवले जाई, विरळ हवेमुळे आधीच त्रासलेल्या यात्रेकरूंना जेवणाला उशीर होत असे. बरेच यात्रेकरू जेवणाची वाट ना पाहताच झोपून जात असत. पण आता यात्रेकरूंना थांब्यावर पोचताच गरमागरम, आरोग्यदायी जेवण मिळेल, ते रात्री २ वाजता जरी तिथे पोचले तरी त्यांना गरमागरम जेवण मिळेल.”
मधुबन फूड्सचे सुमित प्रताप गुप्ता यांनी सांगितले की, “या यात्रेसाठीची सर्व कामे अतिशय खराब हवामानात व कठीण अशा भूभागांमध्ये करावी लागतात. किराणा सामान, भाज्या, फळे, प्रशिक्षित कर्मचारी, इंधन, भांडी, साहित्य व इतर सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी यात्रेसोबत खूप दुर्गम भागांमध्ये न्याव्या लागतात, जेणेकरून यात्रेकरूंना सर्व सेवा नीट पुरवल्या जातील.”
कैलास यात्रेदरम्यान पुरवले जाणारे खाद्यपदार्थ हे सात्विक असतात. कटरा, गुरुग्राम व शिर्डी येथील पवित्र स्वयंपाकघरांमध्ये जे सात्विक भोजनाचे नियम पाळले जातात ते सर्व नियम याठिकाणी काटेकोरपणे पाळले जातात. कैलास मानसरोवर यात्रेच्या संपूर्ण मार्गावरील स्वयंपाकघरांमध्ये सात्विक भोजनाबाबत खूप काळजी घेतली जाते. सुमित प्रताप गुप्ता यांनी पुढे असेही सांगितले की, “यात्रेकरुंसाठीचे दर दिवशीचे दुपार व रात्रीच्या जेवणाचे मेनू अतिशय काळजीपूर्वक ठरवलेले असतात, ट्रेकदरम्यान त्यांची शारीरिक शक्ती टिकून राहावी यावर भर दिलेला असतो. यासाठी नामवंत पोषणतज्ञांची मदत घेतली जाते, यात्रा सुरक्षितपणे पूर्ण करावी यासाठी यात्रेकरूंचे मनोधैर्य वाढावे, विरळ हवेत त्यांना आवश्यक असलेले सर्व पोषण मिळावे याची
नीट काळजी घेतली जाते.”
टिप्पणी पोस्ट करा