मुंबई (३१ जुलै २०१८) : खासगी संवर्गातील चारचाकी वाहनांकरिता सध्या MH-01-DB ही मालिका सुरु असून महाराष्ट्र मोटार वाहन नियम तरतुदीनुसार MH-01-DE ही नवीन मालिका आगाऊ सुरु करण्यात आली आहे. MH-01-DB ही मालिका संपेपर्यंत MH-01-DE या मालिकेतील नोंदणी क्रमांक तिप्पट शुल्काचा भरणा करुन जनतेस आरक्षित करता येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी दिली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी/चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येते. वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या सुधारीत नियम 54 (अ) नुसार आगाऊ शुल्क भरुन आरक्षित करण्याची तरतूद आहे. सन 2017-18 या कालावधीकरिता 7 कोटी 28 लाख 60 हजार 500 रु. इतका महसूल वाहन क्रमांक आरक्षण शुल्काद्वारे शासनास प्राप्त झाला आहे. कार्यालयीन विहित नमुन्यातील अर्जान्वये कोणताही विहित शुल्काचा धनाकर्ष ‘प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य)’/’Regional Transport Office, Mumbai (Central)’ यांच्या नावे सादर करणे आवश्यक असते. आरक्षित केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता 30 दिवसांकरिता असते. 30 दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी क्र. E-18 वर वाहन क्रमांक आरक्षित करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. तसेच आवश्यक त्या मार्गदर्शनाकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
वाहन क्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची छायांकित प्रत वाहन नोंदणी कागदपत्रांच्या मुखपृष्ठावर चिटकविलेली असल्यास त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक देणे शक्य होते. वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता छायाचित्र असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा