(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली | मराठी १ नंबर बातम्या
" />

माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई ( २२ ऑगस्ट २०१८ ) : माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. तसेच या महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget