(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वंचित व दुर्बल घटकातील मुलांच्या ऑनलाईन शाळा प्रवेशाबाबतची तिसरी सोडत | मराठी १ नंबर बातम्या
" />

वंचित व दुर्बल घटकातील मुलांच्या ऑनलाईन शाळा प्रवेशाबाबतची तिसरी सोडत

मुंबई ( ३ ऑगस्ट २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत करावयाच्या अर्जाची तिसरी सोडत दिनांक ०४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता हिंदू कॉलनी दादर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या करिता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE) अंतर्गत पात्र खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्पसंख्याक शाळां वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (entry level) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्या २५ टक्के जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेच्या प्रणालीव्दारे दि. १३ मार्च २०१८ रोजी प्रथम सोडत आणि दिनांक ११ जून २०१८ रोजी दुसरी सोडत काढण्यात आली होती. तर आता उद्या शनिवार दिनांक ४ ऑगस्ट २०१८ रोजी तिसरी सोडत काढण्यात येणार आहे.

तथापि, वरील तपशीलानुसार निवड झालेल्या विद्यर्थ्यांना प्रवेशीत करुन घेण्यासंबधी शाळांना कळविण्यात आले आहे. प्रवेशाबाबत काही अडचण उदभवल्यास किंवा शाळेने सहकार्य न केल्यास एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा:
उपशिक्षणाधिकारी (खाजगी प्राथमिक शाळा विभाग) यांचे कार्यालय,पोर्तुगीज चर्च जवळ, एमटीएनएल मार्ग, भाटेवाडी, दादर पश्चिम, मुंबई- ४०० ०२८. दूरध्वनी ०२२-२४२२ ४३९४. तसेच इतर बोर्डाच्या शाळांसाठी शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/ पश्चिम), महाराष्ट्र शासन आणि शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय, चर्नी रोड (पश्चिम). दूरध्वनी ०२२-२३६३ ००८६.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget