(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन खासदारांनी घेतली शपथ | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन खासदारांनी घेतली शपथ

नवी दिल्ली ( १८ जुलै २०१८ ) : संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या लोकसभेत आज महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या दोन खासदारांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ घेतली.

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय मंत्री व सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते. शपथ घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघातून नव्याने निवडून आलेले खासदार राजेंद्र गावीत आणि भंडारा व गोंदिया लोकसभा मतदासंघातून निवडून आलेले खासदार मधुकरराव कुकडे यांचा समावेश आहे .

खासदार राजेंद्र गावीत यांनी मराठीत शपथ घेतली तर मधुकरराव कुकडे यांनी हिंदीतून शपथ घेतली. पालघरचे माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर येथील जागा रिक्त झाली होती तर माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा–गोंदिया लोकसभा मतदार संघाचे पद रिक्त होते. रिक्त जागा भरण्यासाठी या दोन्ही मतदार संघात नुकत्याच पोट निवडणुका घेण्यात आल्या होत्या.

देशातील तीन राज्यांमधून एकूण चार सदस्य लोकसभेवर निवडून आले असून महाराष्ट्रातील दोन सदस्यांचा यात समावेश आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ 16 व्या लोकसभेच्या शेवटापर्यंत राहणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget