(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतीदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतीदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली ( ८ ऑगस्ट २०१८ ) : ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरूवारी क्रांती दिनी राष्ट्रपती भवन येथे सन्मान होणार आहे.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात येते. गुरूवारी सन्मान होणा-या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातील कुपवडा येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ. अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान होणार आहे. ‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्ती संग्राम’, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, यासोबतच देशभरात झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी 9 ऑगस्ट ‘क्रांती दिनी’ सन्मान केला जातो.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget