(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल देशभर सात दिवसांचा दुखवटा | मराठी १ नंबर बातम्या
" />

भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल देशभर सात दिवसांचा दुखवटा

मुंबई ( १६ ऑगस्ट २०१८ ) : भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यामुळे दि. 16 ते 22 ऑगस्ट, 2018 या संपूर्ण कालावधीत देशभर शासकीय दुखवटा राहील. या कालावधीत कोणतेही कार्यालयीन मनोरंजनाचे (Official Entertainment) कार्यक्रम होणार नाहीत. या कालावधीत संपूर्ण भारतात ज्या ठिकाणी दररोज राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या ठिकाणी वरील कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तात्काळ सूचना द्याव्यात. उद्या सकाळी अशा ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील, याची दक्षता घ्यावी, असे राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव सतीश जोंधळे यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget