(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील 4 तुरूंग कर्मचा-यांना सुधारक सेवा पदक जाहीर | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्रातील 4 तुरूंग कर्मचा-यांना सुधारक सेवा पदक जाहीर

नवी दिल्ली ( १४ ऑगस्ट २०१८ ) : देशभरातील 36 तुरूंग अधिकारी-कर्मचा-यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील 4 तुरूंग कर्मचा-यांचा समावेश आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशभरातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 36 तुरूंग अधिकरी-कर्मचा-यांना सुधारक सेवा पदके जाहीर झालेले आहेत. यात 5 तुरूंग अधिका-यांना असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सेवा पदक तर उल्लेखनीय सेवेसाठी 31 तुरूंग अधिकारी-कर्मचा-यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 4 तुरूंग कर्मचा-यांचा समावेश आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार कलप्पा मलकप्पा कुंभार, मुंबई जिल्हा महिला कारागृहाचे हवालदार कैलास शालिक बाऊस्कर, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई संजय राजारामजी तलवारे, शिपाई राजू विठ्ठल हाटे या तुरूंग कर्मचा-यांचा समावेश आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget