(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या
" />

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

741 एक दिवसीय मेळाव्यांमद्धे राज्यातील 50 हजाराहून अधिक शेतकर्‍यांचा सहभाग

पुणे ( २ ऑगस्ट २०१८ ) : महाराष्ट्र राज्याची अग्रणी बँक असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ तर्फे दिनांक 28 जुलै रोजी राज्यामधील बँकेच्या 741 ग्रामीण/अर्धशहरी शाखांमार्फत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. “बँक आपल्या दारी” या योजनेची संकल्पना अंमलात आणून शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत बँकेच्या कृषी योजनांची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून बँक अधिकार्‍यानी शेतकर्‍यांना दिली.

बँकेच्या देशभरात 1846 शाखांचे जाळे असून त्यातील 1132 शाखा महाराष्ट्र राज्यामधे आहेत. यातील 766 ग्रामीण/अर्धशहरी शाखा शेतकर्‍यांना कृषी विषयक योजनांच्या माध्यमातून वित्तीय सेवा देत आहेत. 

या मेळाव्यात बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर आंचल कार्यालयातील अधिकारी त्याचबरोबर शाखाप्रमुख आणि कृषी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन महाबँक किसान क्रेडिट कार्ड यासह बँकेच्या इतर कृषी विषयक योजनांची माहिती दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या नव्या पीककर्ज मंजुरीसह छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत असलेल्या लाभार्थीवर नव्याने कर्ज वाटप करण्यास विशेष भर देण्यात आला. तसेच सध्याच्या पीककर्जधारक शेतकर्‍यांना त्यांच्या महाबँक किसान क्रेडिट कार्डाचे तात्काळ नूतनीकरण करून सवलतीच्या योजनेच्या कर्ज व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मेळाव्यातील शेतकर्‍यांना बँकेच्या अधिकार्‍यानी कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, यासारख्या किरकोळ (रिटेल) कर्जाबरोबरच मुद्रा कर्ज तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांमधील प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना, अटल पेन्शन योजनांविषयी मेळाव्यामधे चर्चा करून माहिती देण्यात आली.

मेळाव्यास बँकेने बॅनर आणि पोस्टर प्रदर्शित केले. सहभागी शेतकर्‍यांना कृषि कर्ज योजनाविषयी मराठीमधे छापलेले माहितीपत्रके वितरित केले. गावागावामधील सरकारी अधिकारी / सन्माननीय व्यक्तीं या कार्यक्रमामधे सहभागी झाले होते. मेळाव्यामधेच काही निवडक शेतकर्‍यांना ताबडतोब कर्ज मंजूरी पत्र दिली गेली. कर्जासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची यादी आणि कृषी कर्ज अर्जदेखील वितरित केले गेले.

राज्यातील सर्व भागातील शेतकर्‍यांकडून बँकेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या अभियानामधे 50,000 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी सहभाग घेतला ज्यात रु.180.00 कोटीच्या जवळपास 20,000 कर्ज अर्ज प्राप्त झाले. अभियानावेळी पीककर्जासाठी 10,000 शेतकर्‍यांना त्याचवेळी रु. 85.00 कोटी रुपयांचे सैद्धांतिक मंजूरी पत्रे दिली गेली. बँकेद्वारा सुरू करण्यात आलेल्या या वेगळ्या उपक्रमाबाबत शेतकर्‍यांनी गौरवोद्गार काढून वास्तवामधे बँक ऑफ महाराष्ट्र “शेतकर्‍यांची जिव्हाळ्याची बँक“ असल्याचे महाबँकेने सिद्ध केले. महाराष्ट्र राज्याची एसएलबीसी संयोजक असलेल्या महाबँकेंनी तात्काळ घेतलेले निर्णय आणि ग्राहकांना वेळेवर केलेल्या मदतीच्या आश्वासनाबरोबर संपूर्ण कृषी समुदायाच्या कल्याणासाठी केलेला हा एक नवा प्रयत्न आहे. यापुढेही भविष्यात बँकेमार्फत असेच उपक्रम चालू रहातील असे बँकेमार्फत सांगण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget