(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अत्युच्च गुणवत्ताधारक 33 खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या
" />

अत्युच्च गुणवत्ताधारक 33 खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

मुंबई ( ३ ऑगस्ट २०१८ ) : महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज क्रीडा विभागाला दिले. याबरोबरच कुस्तीपटू राहुल आवारे यांनाही थेट नियुक्ती देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सर्वसाधारण खेळाडूंच्या प्राप्त 98 अर्जांपैकी 23 आणि दिव्यांगांमधून प्राप्त 26 अर्जापैकी 10 अशा 33 खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गुणवत्ता पूर्ण खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, क्रीडा संचालक सुनील केंद्रेकर यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले, शासन सेवेत आलेल्या या 33 खेळाडूंनी आपापल्या खेळात अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे. या 33 खेळाडूंना क्रीडा विभागात गट अ ते गट ड प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.

शासन सेवेत थेट नियुक्ती मिळविणाऱ्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे
अ.क्रं.
खेळाडूचे नाव
खेळ
प्राविण्यप्राप्त स्पर्धा
1
ललिता शिवाजी बाबर
मैदानी स्पर्धा,
17 वी एशियन गेम्स, तृतीय   पारितोषिक
2
जयलक्ष्मी सारीकोंडा
धनुर्विदया
वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पिअनशिप, कांस्य पदक
3
भक्ती अजित आंब्रे
पॉवरलिप्टिंग
एशिअन ओपन पॉवरलिप्टिंग चॅम्पिअनशीप, तृतीय पारितोषिक
4
अंकिता अशोक मयेकर
पॉवरलिप्टिंग
एशिअन ओपन पॉवरलिप्टिंग चॅम्पिअनशीप, 
द्वितीय पारितोषिक
5
अमित उदयसिंह निंबाळकर
पॉवरलिप्टिंग
एशिअन ओपन पॉवरलिप्टिंग चॅम्पिअनशीप, 
द्वितीय पारितोषिक
6
सारीका सुधाकर काळे
खो खो
3 री एशियन खो खो चॅम्पिअपनशीप
प्रथम पारितोषिक
7
सुप्रिया भालचंद्र गाढवे
खो खो
3 री एशियन खो खो चॅम्पिअपनशीप
प्रथम पारितोषिक
8
विजय सदाशिव शिंदे
पॉवरलिप्टिंग
एशिअन ओपन पॉवरलिप्टिंग चॅम्पिअनशीप, 
तृतीय पारितोषिक
9
राहुल बाळु आवारे
कुस्ती
सिनीयर एशियन रेस्लींग चॅम्पिअनपशीप
तृतीय पारितोषिक
10
मोनीका मोतीराम आथरे
मैदानी स्पर्धा
एशियन क्रॉस कन्ट्री चॅम्पिअनशीप
सहभाग
11
स्वप्नील त्र्यंबकराव तांगडे
तलवारबाजी

वर्ल्ड सिनीअर फेन्सींग चॅम्पिअनशीप
सहभाग
12
आनंद दामोदर थोरात
जिम्नॅस्टिक्स
12 वी वर्ल्ड चॅम्पिअनशीप सहभाग
13
सिध्दार्थ महेंद्र कदम
जिम्नॅस्टिक्स
12 वी वर्ल्ड चॅम्पिअनशीप सहभाग
14
मानसी रवींद्र गावडे
जलतरण
9 वी एशियन स्विमिंग चॅम्पिअनशीप
15
नेहा मिलिंद साप्ते
रायफल शुटिंग
1 ली समर युथ ऑलिम्पिक गेम्स
सहभाग
16
रोहित राजेंद्र हवालदार
जलतरण
जागतिक जलतरण अजिंक्यपद
सहभाग
17
युवराज प्रकाश जाधव
खो खो
35 वी नॅशनल गेम्स, केरळ
प्रथम पारितोषिक
18
बाळासाहेब सदाशिव पोकार्डे
खो खो
35 वी नॅशनल गेम्स, केरळ
प्रथम पारितोषिक
19
कविता प्रभाकर घाणेकर
खो खो
35 वी नॅशनल गेम्स, केरळ
प्रथम पारितोषिक
20
सचिन आनंदा चव्हाण
रायफल शूटींग
6 वी एशियन शूटींग चॅम्पिअनशीप
तृतीय पारितोषिक
21
संजीवनी बाबुराव जाधव
मैदानी स्पर्धा
22वी एशियन ॲथलेटिक्स चॅम्पिअनशीप
तृतीय पारितोषिक
22
देवेंद्र सुनील वाल्मिकी
हॉकी
एशियन चॅम्पिअनशीप ट्रॉफी
प्रथम पारितोषिक
23
सायली उदय जाधव
कबडडी
5 वी एशियन कबडडी चॅम्पिअनशीप
प्रथम पारितोषिक
                                 शासन सेवेत थेट नियुक्ती मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे
अ.क्रं.
खेळाडूचे नाव
खेळ
प्रावीण्यप्राप्त स्पर्धा
1
सुयश जाधव
स्विमींग
आयडब्ल्यूएएस वर्ल्ड गेम्स
तृतीय पारितोषिक
पॅराऑलिम्पिक
2
लतिका माने
पॉवरलिप्टिंग
आयडब्ल्यूएएस वर्ल्ड गेम्स
द्वितीय पारितोषिक
पॅराऑलिम्पिक
3
प्रकाश तुकाराम मोहारे
पॉवरलिप्टिंग
2 री एपीसी पॉवरलिप्टिंग कप
तृतीय पारितोषिक
4
इंदिरा सत्ताप्पा गायकवाड
पॉवरलिप्टिंग
आयडब्ल्यूएएस वर्ल्ड गेम्स
पॉवरलिप्टिंग सहभाग
5
सुकांत इंदुकांत कदम
बॅडमिंटन
बीडब्लयूएफ एशिअन पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पिअनशीप
तृतीय पारितोषिक
6
मार्क धरमाई
बॅडमिंटन
बीडब्लयूएफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पिअनशीप
तृतीय पारितोषिक
7
रुही सतीश शिंगाडे
बॅडमिंटन
बीडब्लयूएफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पिअनशीप
तृतीय पारितोषिक
8
दिनेश वसंतलाल बालगोपाल
टेबल टेनिस
आयडब्ल्यूएएस वर्ल्ड गेम्स
सहभाग
9
ओम राजेश लोटलीकर
टेबल टेनिस
आयटीटीएफ एशिअन पॅरा टेबल टेनिस
सहभाग
10
कांचनमाला पांडे
जलतरण
वर्ल्ड पॅरा स्विमींग चॅम्पिअनशीप
प्रथम पारितोषिक

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget