(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या
" />

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई ( १२ सप्टेंबर २०१८ ) : केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी केले आहे.

मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना आहे. सन 2018-19 साठी ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती आणि शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.dhepune.gov.in आणि
www.jdhemumbai.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 022-22656600 या दूरध्वनी क्रंमाकावर संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांनी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30
सप्टेंबर 2018 आहे. सदर योजनेसाठी विद्यार्थ्यांनी National Scholarship Portal वरील मार्गदर्शक सूचना आणि Frequently Asked Questions वाचून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget