(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून गोविंदा पथकांना अन्याय, अत्याचारा विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून गोविंदा पथकांना अन्याय, अत्याचारा विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली

मुंबई ( ३ सप्टेंबर २०१८ ) : दहीहंडीच्या थरा प्रमाणे बलवान गोविंदा खालच्या थराला तर कमजोर गोविंदा वरच्या थराला या प्रमाणेच राज्यातील कमजोर वर्गाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्यात विकासाची दहीहंडी फोडून शेवटच्या व्यक्ती पर्यंत विकास पोहोचविणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची गोविंदा पथकांना प्रेरणा दिली.

आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

समाजातील प्रत्येक व्यक्तिला समानतेची वागणूक देण्याचा संदेश या दहीहंडीतून मिळतो. अन्याय-अत्याचार व भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी
खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रसाद लाड, सिनेअभिनेते शेखर सुमन यांच्यासह विविध मंडळाचे गोविंदा पथक व नागरिक उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget