मुंबई ( १५ ऑक्टोबर २०१८ ) : खलनायक म्हणून चुकीची प्रतिमा रंगविण्यात आलेल्या रावणाचे दहन बंद करून दहन करणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेमार्फत सोमवारी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदने दिली गेली.
लंकेचा राजा रावणाचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा आहे. परंतु या कृतीने रावणाची पूजा करणा-या देशातील आदीवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. सदर कृतीने प्रदूषण होऊन पर्यावरणाचा -हास देखील होत असल्याची चिंता भीम आर्मीने व्यक्त केली आहे.
देशातील सतीची प्रथा,विधवा विवाहास मनाई तसेच अंधश्रध्दा आदी अनेक चुकीच्या प्रथा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र रावण दहनासारखी अनिष्ट प्रथा हळू हळू कमी बंद होत असून ती कायमची बंद करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे व महासचिव सुनील थोरात यांनी केली आहे.
या मागणीसाठी संघटनेमार्फत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त यांना भीम आर्मीचे महाराष्ट्र पदाधिकारी, विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी यांनी निवेदने दिली आहेत.
''भीम आर्मी'' चे निवेदन
विषय - न्यायप्रिय, महात्मा राजा रावण दहन प्रथा बंद करण्याबाबत
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की, महात्मा राजा रावण हे अत्यंत समृध्द संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे.महात्मा राजा रावण ,संगीत तज्ञ, राजनितिज्ञ, शिल्पकार , नितीतज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट रचनाकार , समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उद्गगाता , न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महत्तम राजा होता.अशा महान राजाला इथल्या षडयंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही.
वास्तविक राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही.
तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती हि मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे.महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगड , मध्यप्रदेश , झारखंड येथे रावणाची पूजा केली जाते .रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आहे.परंतू आदिवासींच्या या समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उदगाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील आदिवासी समाजासह जागृत झालेल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात.शिवाय या दहन प्रथेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा -हास होत आहे.
महोदय देशात आणि राज्यात अनेक कालबाह्य वाईट प्रथा परंपरा बंद करण्यात आल्या सतीची चाल यापूर्वीच बंद झाली असून विधवांना पुनर्विवाह करण्यास देखील परवानगी मिळालेली आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदादेखील अस्तित्वात आला आहे महाराष्ट्राने पर्यावरणाचा -हास होतो म्हणून अनेक कायदे केले असून डीजे वाजविण्यावर बंदी आणण्यास आली आहे , सार्वजनिक सभेतील स्पीकर व भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण आणले आहे मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवरदेखील बंदी घालण्यात आली असून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे .
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करीत असताना रावणाच्या भल्या मोठ्या पुतळ्याला बीभत्स स्वरूप देऊन त्यात मोठ्या आवाजाचे फटाके भरण्यात येतात त्यामुळे मोठमोठे आवाज होऊन प्रदूषण वाढते आहेत याचा त्रास संबंधित विभागातील जनतेला होतो. त्यामुळे राज्य सरकारने रावण दहण करण्याची परवानगी देण्यात येवू नये.ही प्रथाच बंद करण्यात यावी.
दस-याच्या दिवशी रावण दहण करण्याचा प्रयत्न कुणी करीत असल्यास त्यांची जनजागृती करावी व अशा आयोजकांना रावण दहनाची परवानगी देण्यात येऊ नये मात्र तरीही प्रथेच्या नावाखाली कुणी जर असा प्रकार केल्यास आदिवासी संघटना व एकंदरीत समाजाच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे जी मंडळी रावण दहन करतील अशा लोकांविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३ (अ ), २९५ ,२९८, मुंबई पोलिस अँक्ट १३१,१३४,१३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
ही अनिष्ठ प्रथा त्वरीत बंद करण्यात यावी.तसेच रावणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.

टिप्पणी पोस्ट करा