मुंबई ( २३ ऑक्टोबर २०१८ ) : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोड केली आहे. यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये 'बहीण बीज' (भाऊबीज) त्यांनी मंजूर केली असून लवकरच सेविकांच्या बॅंक खात्यात ही भेट जमा होणार आहे. सुमारे २ लाख ७ हजार ९६१अंगणवाडी सेविकांना ही भेट मिळणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण दोन लाख सात हजार ९६१ मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे 'बहिण बीज' (भाऊबीज) भेट रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा