(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार | मराठी १ नंबर बातम्या
" />

जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार

मुंबई ( १ ऑक्टोबर २०१८ ) : ज्‍येष्‍ठ नागरिकांचा अनुभव हा आजच्‍या तरुण पिढीला मिळणे फार आवश्यक असून त्‍यांच्‍या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्‍याची दिशा मिळणार असल्‍याने त्‍यांचा सन्‍मान हा सातत्‍याने होण्‍यासोबतच तो प्रत्‍येक मुंबईकरांच्‍या कृतीतूनही दिसला पाहिजे असे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.

जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार समारंभ माटुंगा (प.) च्‍या यशवंत नाटय मंदिरात आज (दिनांक ०१ ऑक्‍टोंबर २०१८) आयोजित करण्‍यात आला होता, त्‍यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा स्मिता गावकर, जी/उत्‍तर प्रभाग समितीच्‍या अध्‍यक्षा मरिअम्‍माल थेवर, नगरसेविका सर्वश्रीम. हर्षला मोरे, मुमताज खान, नगरसेवक वसंत नकाशे, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे (फेसकॉम) अध्‍यक्ष शरद डिचोलकर, सचिव विनायक खांबेटे, ‘ जी/उत्‍तर ’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त (प्र.) अशोक खैरनार, सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ.संगीता हसनाळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते प्रारंभी वयाचे ९० वर्ष पूर्ण केलेल्‍या सदाशिव सहस्‍त्रबुध्‍दे, गोविंद धारगळकर, विनायक कामत, सुमती सावंत, एम.पी खेडकर, विनायक पिंगळे, प्रमिला राऊत या ज्‍येष्‍ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, ज्‍येष्‍ठ नागरिकांना खरी गरज ही माया, आपुलकी, प्रेमाची असते. आपण सुध्‍दा एक वेळा ज्‍येष्‍ठ होणार आहोत हे सदैव प्रत्‍येकाने ध्‍यानात ठेवावे, असेही महापौरांनी सांगितले . ज्‍येष्‍ठ नागरिकांना ‘बेस्‍ट’ च्‍या बस भाडयामध्‍ये यापुढे ५० टक्‍के सुट देण्‍याचे प्रशासकीय स्‍तरावरील काम पूर्ण झाले असून लवकरच बेस्‍ट सवलत सुरु करणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी जाहिर केले. प्रत्‍येक मनुष्‍याने आपल्‍या आयुष्‍यात तारुण्‍य, संपत्‍ती, सौंदर्य, सत्‍ता याचा कधीही अहकांर न बाळगता आपण समाजव्‍यवस्‍थेचे एक घटक असून लोककल्‍याण हा आपला उद्देश असला पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक ज्‍येष्‍ठ नागरिकाला चांगले आरोग्‍य लाभो अश्‍या शुभेच्‍छा महापौरांनी शेवटी दिल्‍या.

महिला व बालकल्‍याण समिती अध्‍यक्षा स्मिता गावकर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, कुटुंब व मुलांच्‍या प्रगतीसाठी ज्‍येष्‍ठांनी आपले आयुष्‍य खर्ची घातलेले असते. त्‍यामुळे ज्‍येष्‍ठ नागरिकांचा चांगल्‍यारितीने सांभाळ करावा व त्‍यांच्‍या आर्शिवादानेच आपण यशोशिखर गाठू शकतो, हे प्रत्‍येकाने लक्षात ठेवावे असेही त्‍या शेवटी म्‍हणाल्‍या.

ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्‍यक्ष शरद डिचोलकर यांनी आपल्‍या मार्गदर्शनातून प्रत्‍येक ज्‍येष्ठ नागरिकांनी एकटे न राहता ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे सदस्‍य होण्‍याचा सल्‍ला दिला, जेणेकरुन सर्वांच्‍या सहकार्य व प्रेमामुळे आपल्‍या आयुष्‍यात आनंद निर्माण होणे शक्‍य असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍यासोबतच ज्‍येष्‍ठ नागरिक धोरणाला महापौरांनी गती देऊन ज्‍येष्‍ठ नागरिक कक्ष तातडीने सुरु करावा, अशी सूचना त्‍यांनी केली.

सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ.संगीता हसनाळे यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून ज्‍येष्ठ नागरिकांना देण्‍यात येणाऱया सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्‍याचप्रमाणे महापालिकेने प्रथमच अल्‍झायमर डे साजरा केला असून या आजारावरील उपचाराचा खर्च महापालिका स्‍वतः करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली लवकरच ज्‍येष्‍ठ नागरिक संघाची स्‍थापना करण्‍यात येत असून वर्षातून संघाच्‍या दोन बैठका घेणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी उपस्‍थि‍तांना दिले. याप्रसंगी ज्‍येष्ठ नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget