“स्टॅच्यू ऑफ युनिटी” च्या अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

मुंबई ( 13 ऑक्टोबर 2018 ) : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'च्या दि. 31 ऑक्टोबर 2018रोजी होणाऱ्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी शिष्टमंडळासमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी या शिष्टमंडळात खासदार सी.आर.पाटील, आमदार ॠषीकेश पटेल, कनुभाई पटेल, कनुभाई देसाई, प्रदिप परमार, सचिव मिलींद तोरवणे, प्रशासकीय अधिकारी राकेश शंकर आदींचा समावेश होता. यावेळी उपमुख्यमंत्री पटेल यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीची माहिती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचा इतिहास सांगणारे पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिले.

पटेल म्हणाले, देशातील एकता आणि अखंडतेचे शिल्पकार असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली देण्यासाठी गुजरातमधील नर्मदा जिल्हास्थित केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” उभारण्यात आली आहे. हा 182 मीटरचा जगातील सर्वात ऊंच पुतळा असून यामुळे देशातील पर्यटन उद्योगाला गती मिळणार आहे. हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. 15 हजार पर्यटक एका दिवशी भेट देऊ शकतील एवढी याची क्षमता आहे. सरदार संग्रहालय, 8 कि.मी ची फ्लावर व्हॅली या स्थळाचे आकर्षण असून येथे सरदार पटेल यांची जीवनगाथा लेझर शो द्वारे दाखविण्यात येईल, अशी माहिती ही त्यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget