भीम आर्मीचे नेते ऍड . चंद्रशेखर आझाद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

मुंबई ( १ ऑक्टोबर २०१८ ) : सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ कारावासातून मुक्त झालेले भीम आर्मी या संघटनेचे नेते ऍड. चंद्रशेखर आझाद लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. भीम आर्मी सामाजिक संघटना असून अराजकीय संघटना असली तरी येत्या काळात किंगमेकरच्या भूमिका पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उत्तर प्रदेशातील शब्बीरपूर येथे २०१७ मध्ये झालेल्या जातीय हिंसेनंतर भीम आर्मी संघटनेचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यासह या संघटनेच्या एक हजारहून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यातील सर्व कार्यकर्त्यांची मुक्तता झाली असली तरी तेथील प्रशासनाने आझाद यांच्याविरोधात रासूंक अंतर्गत कारवाई केली होती. हा रासूंक संपण्यापूर्वी दोन महिने अगोदर आझाद यांची सुटका करण्यात आली. या सव्वा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भीम आर्मी प्रसिद्धीझोतात आली. आज या संघटनेच्या देशातील २६ राज्यात विस्तार झाला असून महाराष्ट्रात या संघटनेने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. महाराष्ट्रात आझाद यांना आणण्यासाठी या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथे जाऊन आझाद यांची भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले.

मुंबईत भीम छाया सांस्कृतिक केंद्र कालीना सांताक्रूझ येथे या संघटनेच्या महाराष्ट्र कमिटी तसेच विभागीय कमिटीची संयुक्त बैठक संपन्न झाली. आझाद यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रात जाहीर सभेचे निमंत्रण आझाद यांना देण्यात आल्याचे या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी बैठकीत सांगितले. मुंबईतील दादर चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी, भिमाकोरेगाव विजयस्तंभ तसेच वढू गाव या ठिकाणी आझाद आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भेटी देणार आहेत. आझाद यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी करण्यासाठी पूर्व सूचना देण्यासाठी येत्या रविवारी ७ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र कमिटीची संयुक्त बैठक औरंगाबाद येथे घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्व जिल्हाप्रमुख यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व माहितीसह या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र सचिव सुनीलभाऊ थोरात, महाराष्ट्र सचिव मनीषभाऊ साठे, महाराष्ट्र उपप्रमुख रणधीर आल्हाट, कोषाध्यक्ष नेहताई शिंदे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज बनसोडे, वर्षांताई शिंदे, मुंबई प्रमुख सुनीलभौ गायकवाड, औरंगाबाद विभाग प्रमुख बलराज दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख उत्तरेश्वर कांबळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख राहुल वाघ, विदर्भ प्रमुख अकबरभाई शेख कोकण विभाग प्रमुख संतोष कीर्तिकर, यांच्यासह महाराष्ट्र कोअर कमिटी यावेळी उपस्थित होते.

https://youtu.be/-hiZy2q89n4
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget