विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर

मुंबई ( १२ ऑक्टोबर २०१८ ) : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील दहा विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या संबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती योजना लागू होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने 21 ऑगस्ट 2018 रोजी राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर विभागाने या संबंधीचा हा शासन निर्णय दि. 11 ऑक्टोबर 2018 रोजी काढला आहे. राज्यातील या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी टाईम्स हायर एज्युकेशन किंवा क्यूएस रँकिंग 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी अभ्यासक्रम व औषधनिर्माण शास्त्र यामधील प्रत्येकी एक व अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्रसाठी चार अशा एकूण दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यापैकी 30टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 35 वर्षे तर पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे ही वयोमर्यादा आहे. तसेच विद्यार्थ्याच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही आठ लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget