(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बिजींगच्या उपराज्यपालांनी घेतली पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या
" />

बिजींगच्या उपराज्यपालांनी घेतली पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट

पर्यटन, चित्रपट आदी क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढणार

मुंबई, दि. 17 : चीनमधील नागरीकांना बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटांचे कमालीचे आकर्षण असून अनेक हिंदी चित्रपट तिथे बॉक्स ऑफीसलाही मोठे यश मिळवतात. भारतीय चित्रपटांचे तंत्रही खूप विकसीत असून ते चीनी चित्रपट
क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे मत बिजींगचे उपराज्यपाल डू फिजीन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि बिजींगदरम्यान पर्यटन, चित्रपट, उद्योग, व्यापार, विद्यार्थी देवाण-घेवाण आदींचा विकास करण्यासंदर्भात आज त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रातील देवाण-घेवाणीबाबत चर्चा झाली.

चीनी नागरीकांना बॉलीवूड चित्रपटांचे आकर्षण

चीनमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांचे तर भारतातील चित्रपट महोत्सवांमध्ये चीनी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. पर्यटन मंत्री रावल यावेळी म्हणाले, भारत आणि चीन देशातील नागरिकांच्या भाव-भावना आणि संवेदना एकच असल्याने बॉलीवूडचे चित्रपट चीनमध्ये लोकप्रिय ठरतात. दोन्ही देशातील चित्रपट व्यवसायाला चालना देण्यासाठी याचा निश्चित उपयोग करण्यात येईल.

चीनमध्ये बौद्ध धर्मीय अनुयायांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील बौद्ध पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्रातील अनेक लेण्या या बौद्ध धर्माचा तसेच बौद्ध विचारधारेचा इतिहास जागृत करतात. चीनी बांधवांनी या लेण्यांना अधिकाधिक संख्येने भेट द्यावी. महाराष्ट्र आणि चीनमधील बौद्ध पर्यटन विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले. या प्रस्तावास उपराज्यपाल डू फिजीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बिजींग आणि महाराष्ट्रादरम्यान शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची देवाण-घेवाण करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. उपराज्यपाल डू फिजीन यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळात बिंजीगचे प्रसिद्धी महासंचालक यांग शुओ, उपमहासंचालक (परराष्ट्र व्यवहार) झांग क्यु, चीनचे मुंबईतील कौन्सुलेट जनरल टँग गुओकोई यांच्यासह हु जिंगलाँग, जी गाँगचेंग, वँग हैशान यांचा समावेश होता. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, एमटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget