सहाव्या ‘आयफॅट इंडिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई ( १५ ऑक्टोबर २०१८ ) : गोरेगांव येथील ‘बॉम्‍बे एक्झिबिशन सेंटर’ येथे सहावे ‘आयफॅट इंडिया’ हे प्रदर्शन दिनांक १५ ते १७ ऑक्‍टोगर २०१८ या कालावधीत आयोजित करण्‍यात आले असून त्‍याचे उद्घाटन जर्मनीचे वाणिज्‍य दूत डॉ. जॉर्जन मोरहार्ड यांच्‍या हस्‍ते, तर महापालिका उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, मेस मिनीहारचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सिंग यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १५ ऑक्टोबर २०१८) संपन्‍न झाले. याप्रसंगी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका या प्रदर्शनाचे सहआयोजक असून या प्रदर्शनात एकूण २३ देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान खुले असणा-या या पदर्शनात २३५ स्‍टॉल्‍स या ठिकाणी प्रदर्शित करण्‍यात आले आहेत.

मलनिःसारण वाहिन्‍यांवर प्रक्रि‍या करुन ते पाणी पुनर्चक्रीकरणाचे सादरीकरण या प्रदर्शनात करण्‍यात आले असून या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या प्रदर्शनात प्रगत तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने पाणी, मल, घन कचऱयाचे पुनर्चक्रीकरण, शाश्‍वत विकास, निसर्ग संवर्धन या गोष्‍टींचा समावेश आहे.

प्रदर्शनाच्‍या उद्घाटन प्रसंगी उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) राजीव कूकनूर यांनी सांगितले की, महापालिका मलनिःसारण वाहिनीद्वारे विसर्जन होणाऱया पाण्याचे पुनर्चक्रीकरण करुन पिण्‍या व्‍यतिरिक्‍त इतर बाबींसाठी त्या पाण्याचा कसा वापर करता येईल, यावर महापलिका काम करीत असल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनाच्‍या दृष्‍टीनेही महापालिका काम करीत असल्‍याचेही कूकनूर यांनी यावेळी सांगितले.

दिनांक १७ ऑक्‍टोबर, २०१८ पर्यंत ‘हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेने केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget