(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यात 24 हजार 962 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम | मराठी १ नंबर बातम्या
" />

राज्यात 24 हजार 962 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम

मुंबई ( २३ ऑक्टोबर २०१८ ) : ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी, दि. 22 रोजी तब्बल 24 हजार 962 मेगावॅट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली.

यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात 21 हजार 580 मेगावॅट तर मुंबईमध्ये 3 हजार 382 मेगावॅट विजेची मागणी होती.

सध्या ऑक्टोबर हिटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही ऑक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात गेल्या दि. 16ऑक्टोबरला 24 हजार 922 मेगावॅट तर महावितरणकडे 21 हजार 542 मेगावॅट, दि. 17 ऑक्टोबरला 24 हजार 687 मेगावॅट तर महावितरणकडे 21 हजार 223 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानंतर दि. 22ऑक्टोबरला ही मागणी 24 हजार 962 मेगावॅटवर गेली. आजवरची ही उच्चांकी मागणी आहे. याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 21 हजार 580 मेगावॅट विजेची मागणी होती. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे महावितरणकडून 20 हजार 630 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला. राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंत कमी आहे, अशा जी-1 ते जी-3 गटातील वाहिन्यांवर 950 मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले.

राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20 हजार 630मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24 हजार 12 मेगावॅट वीज पारेषीत केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget