(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय ( 23 ऑक्टोबर 2018) : पश्च‍िम महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांसाठी बावधन येथे वन्य प्राणी उपचार केंद्र | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय ( 23 ऑक्टोबर 2018) : पश्च‍िम महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांसाठी बावधन येथे वन्य प्राणी उपचार केंद्र

मुंबई ( २३ ऑक्टोबर २०१८ ) : पुणे वनवृत्तातील बावधन (ता. मुळशी) येथील 22 एकर क्षेत्रावर वन्य प्राण्यांसाठी उपचार केंद्र (ट्रान्झ‍िट ट्रिटमेंट सेंटर) स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी टप्प्या-टप्प्याने 47 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये वन्यप्राणी संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाने केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे वन्य प्राण्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या, बदलता भूवापर, औद्योगिकरण व शहरीकरणामुळे वनांवर दबाव वाढल्याने प्राण्यांसाठी वनक्षेत्र अपुरे पडत आहे. परिणामी वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्यासह रस्ते अपघातांमध्ये जखमी होणे, अन्न-पाण्याच्या शोधात विहिरीत पडणे, त्यांची चुकलेली पिले सापडणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात जखमी व अपंग वन्य प्राण्यांवर उपचारासाठी स्वतंत्र असे केंद्र उपलब्ध नाही. या सर्व बाबींचा विचार करता, पश्चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या जखमी, अपंग व वेदनांनी त्रस्त वन्य प्राण्यांवर उपचार करुन त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी पुणे वनवृत्तात वन्यप्राणी उपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचे संचालन व व्यवस्थापन हे सुयोग्य यंत्रणा किंवा अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget