राज्य शासनाची दसरा भेट - महागाई भत्ता 139 वरुन 142 टक्क्यांवर

मुंबई ( १६ ऑक्टोबर २०१८ ) : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून महागाई भत्ता 139 टक्क्यांवरुन 142 टक्के करण्यात आला आहे.

महागाई भत्ता 1 जानेवारी 2018 पासून लागू होणार असून 1 ऑक्टोबर 2018 पासून या महागाई भत्त्याची वाढ रोखीने देण्यात येणार आहे. दि. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर, 2018 या 9 महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश राज्य शासन निर्गमित करणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget