मुंबई : मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे देण्यात आलेल्या फिरते आरोग्य चिकित्सालय (Mobile Health Clinic Van) लोकार्पण सोहळा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या आवारात दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडला. सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा डॉ. (श्रीमती) अर्चना भालेराव यांच्या हस्ते या फिरते आरोग्य चिकित्सालय सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडचे डीजीएम एन. एम. रोकडे, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालिका डॉ. पद्मजा केसकर आणि अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य, हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रसंगी, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा डॉ. (श्रीमती) अर्चना भालेराव, यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाल्या की, एचआयव्ही बाधितांमधील मृत्युचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने रोगाचे निदान वेळेवर होण्याकरीता फिरते आरोग्य चिकित्सालयामार्फत जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या उपक्रमास मुंबई महानगर पालिकेचा पाठिंबा राहणार असून मुंबई शहरातील ९०% एचआयव्ही बाधितांना शोधणे, एचआयव्ही बाधितांपैकी ९०% मध्ये उपचार सुरु करणे आणि उपचार घेणाऱया ९०% बाधितांमध्ये आजार आटोक्यात आणणे ह्या उद्दिष्टपुर्तीसाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ने केलेल्या सहाय्या बद्दल डॉ. पद्मजा केसकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
फिरते आरोग्य चिकित्सालयाच्या मदतीने दरवर्षी सुमारे ६-८ लाख गरीब लोकवस्तीमधून आरोग्य शिबिरांद्वारे एचआयव्ही आणि गुप्तरोग संबंधी जनजागृती व रक्त चाचणी करणे शक्य होणार असल्याची माहिती मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा